संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार वाटचाल – मुख्यमंत्री

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

गाडगेबाबा यांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा विचार केला. समाजातील वाईट चालीरिती हद्दपार व्हाव्यात यासाठी प्रबोधन केले. त्यांची दशसूत्री जनकल्याणाचा मार्ग दाखविते. या दशसूत्रीनुसारच आमची वाटचाल सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.