राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीतला पुरस्कार प्राप्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटकाच्या चित्ररथाला दुसरा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीतला पुरस्कार प्राप्त झाला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल विभागात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला उत्क़ृष्ट संचलनासाठी पुरस्कार देण्यात आला. संरक्षण विभागात नौदलाच्या संचलनाला सर्वोत्कृष्ट संचलनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केद्रीय शिक्षण मंत्रालया आणि नागरी विमान मंत्रलयाच्या चित्ररथाला मंत्रालय श्रेणीत उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार विभागून देण्यात आला. तीन सदस्यांच्या समितीनं या पुरस्कारांची निवड केली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image