चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्याबाबतच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी अधिसूचना जारी

 

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2022

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या  अधिसूचनेच्या माध्यमातून  सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार  चार वर्षांखालील मुलांना घेऊन दुचाकीवर मागे  बसवून नेणे किंवा त्यांना  दुचाकीवरून नेण्यासाठी  केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केले आहेत.   मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 अंतर्गत हे नियम  अधिसूचित  करण्यात आले आहेत , ज्यामध्ये केंद्र सरकार  नियमांनुसार,   चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे  बसवून नेणे किंवा त्यांना  दुचाकीवरून नेण्यासाठी  मुलांच्या  सुरक्षेसाठी काही उपाययोजना करू शकते.या नियमांमध्ये  सुरक्षा सामग्री  आणि मजबूत  हेल्मेटचा वापर  त्याचप्रमाणे  अशा   दुचाकीचा  वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा हे नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रसिद्ध  झाल्यापासून एका  वर्षानंतर हे नियम लागू होतील.

राजपत्र अधिसूचनेसाठी येथे  क्लिक करा

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image