भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू झाली आहे. यात देशातली आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, बँकांकडे उपलब्ध असलेला निधी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास शुक्रवारी सकाळी १० वाजता द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत.