एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा पराभव केला. प्रगनानन्दा् यांनी काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली.
या आधी त्यांनी लेवोन एयरोनियनला पराभूत केलं होतं. एयरथिंग मास्टर बुद्धिबळ ही ऑनलाईन रॅपिड स्पर्धा असून यात १६ खेळाडूंनी भाग घेतला होता. विश्विनाथन आनन्दन आणि पी. हरिकृष्णयन यांच्यानंतर मेगनस कार्लसनचा पराभव करणारा प्रगनानन्दाा हा तिसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे. या कामगिरीबद्दल, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.