२१व्या शतकात देशाच्या प्रगतीचं नेतृत्व पूर्वेकडची, विशेषत ; ईशान्येकडची राज्य करतील - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २१ व्या शतकात देशाच्या प्रगतीचं नेतृत्व पूर्वेकडची, विशेषतः ईशान्येकडची राज्य करतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेश राज्यस्थापना दिनानिमित्त व्हिडीओसंदेशाद्वारे शुभेच्छा देताना प्रधानमंत्री म्हणाले की अरुणाचल प्रदेशला पूर्व आशियाचं महाद्वार बनवण्याच्या दृष्टीने गेली ७ वर्ष सरकार कसून प्रयत्न करीत आहे.

सुरक्षा मजबूत करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्यात येत असून, निसर्गदत्त सौंदर्याकडे पर्यटक आकर्षित करण्यासाठीही त्याचा उपयोग होईल असं त्यांनी सांगितलं. अरुणाचल प्रदेशची स्वप्न साकार करण्याच्या कामी सरकार कोणतीही उणीव ठेवणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या अरुणाचलमधल्या शहीदांचं त्यांनी स्मरण केलं.