आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदक विजेत्या ८ खेळाडूंना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना राज्य सरकारकडून विशेष पुरस्कार जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं आंतराष्ट्रीय स्तरावरच्या राज्यातले ८ पदक विजेते खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना विशेष क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. यात कुस्तीपटू विजय पाटील, नरसिंग यादव, राहुल आवारे, नेमबाज शाहू माने, तेजस्विनी सावंत, स्केटिंगपटू विक्रम इंगळे, धावपटू अविनाश साबळे, पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम यांचा समावेश आहे. स्पर्धेतली कामगिरी, स्पर्धेचा स्तर ध्यानात घेऊन या खेळांडूंना १ लाख रुपये ते १० लाख रुपये या दरम्यानची पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत. तर त्यांच्या प्रशिक्षकांना २५ हजार ते अडीच लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात येणार आहे. राज्याच्या क्रीडा धोरणानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून राज्याचं नाव उज्ज्वल केलेल्या पदकप्राप्त खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना हे पारितोषिक देऊन गौरवलं जातं.