सर्व खबरदारी घेऊन, विचार विनिमय करुन शाळा सुरू केल्या जात असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचं आरोग्यमंत्र्यांचं पालकांना आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या पूर्वप्राथमिक वर्गापासूनच्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय जगभरातली परिस्थिती पाहून आणि लहान मुलांबाबतच्या कृती दलाशी चर्चा करुन घेतला आहे. त्यामुळं पालकांनी मुलांना शाळेत जाण्याची परवानगी द्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पालकांना केलं आहे. शाळा सुरू करताना सर्व खबरदारी घेतली जाते आहे, शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज्यात लसीकरणाचं प्रमाण वाढतं आहे. कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं किंवा आयसीयुमध्ये दाखल करावं लागण्याचं प्रमाण कमी आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तरी हळूहळू निर्बंध शिथिल केले जातील, असं ते म्हणाले.