दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन इथं सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावात मिळालेल्या १३ धावांच्या आघाडीसह भारताची एकूण आघाडी आता ९३ धावांपर्यंत पोहचली आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा विराट कोहली आणि ऋषभ पंत हे भारतीय फलंदाज अनुक्रमे १६ आणि २० धावांवर खेळत होते. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस असून हा सामना निकाली होण्याच्या मार्गावर आहे. मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यांपैकी एकेक सामना जिंकून दोन्ही संघानी मालिकेत बरोबरी साधली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image