दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल यशाचं प्रदर्शन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल या यशाचं प्रदर्शन करण्यात आलं. दुबई इथल्या या जागतिक प्रदर्शनात भारतीय विभाग हा आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरला असून आतापर्यंत पाच लाख जणांनी त्याला भेट दिली आहे. भारताच्या भूतकाळातील आणि भविष्यातल्या योजनांची माहिती इथे प्रदर्शित करण्यात आली आहे. हे प्रदर्शन मार्च अखेरपर्यंत चालणार आहे.