व्हिजन इंडिया अॅट २०४७ या बैठकीचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह अध्यक्षस्थान भूषवणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शासनासंदर्भातील व्हिजन इंडिया अॅट २०४७ ची संकल्पना साकार करण्याकरता या क्षेत्रातील तज्ञांसोबत आज होणाऱ्या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह भूषवणार आहेत. ते, संरचनात्मक तसंच संस्थात्मक सुधारणांबाबत तज्ज्ञांकडून सूचना जाणून घेतील. प्रशासनिक सुधारणा आणि लोकतक्रार विभागाद्वारे आयोजित बैठकीत शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. केंद्रीय सचिवालयात निर्णय घेण्याच्या क्षमतेत सुधारणा, प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करणं, मंत्रालय तसंच विभागातील कामकाज सुसंगत बनवणं, लोकसेवेत पारदर्शकता आणि उत्तदायित्व आणणं, प्रभावी कार्यकारी संस्था निर्माण करणं यावर बैठकीत विचार-विनिमय केला जाईल.