मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९१ हजार ४५७ झाली आहे. मुंबईत काल नोंद झालेल्या रुग्णांपैकी ५ हजार ७१२ रुग्ण लक्षण नसलेली किंवा अगदीच सौम्य लक्षणं असलेली आहेत. यापैकी केवळ ३८९ जणांचा रुग्णालयात दाखल करावं लागलं अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.मुंबईत काल ४५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या मुंबईभरात २२ हजार ३३४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतल्या कोरोना बाधितांसाठीच्या ३० हजार ५६५ रुग्णखाटा अजूनही उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्यविभागानं दिली आहे. दरम्यान मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंट बाधितांची संख्या वाढते आहे. कोरोनाचा संसर्ग आता झोपडपट्टयांतही पसरतो आहे. त्यामुळे चार महिन्यांनंतर कंटेनमेंट झोनमुक्त झालेल्या झोपडपट्ट्यांमध्ये पुन्हा एकदा ‘नाकाबंदी’ सुरू झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ल्यामध्ये ७, ग्रँट रोड-गिरगाव परिसर ३ आणि वरळी विभागात एक कंटेनमेंट झोन पालिकेनं घोषित केला आहे. मुंबईत सध्या एकूण १२८ पूर्ण इमारती सील असून ३ हजार २० मजलेही सील आहेत. त्यामुळे सुमारे १ लाख ८० हजार घरांमधले तब्बल सात लाखांहून अधिक रहिवासी निर्बंधांमधे आहेत.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image