महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन येत्या ७ तारखेला सोलापुरमध्ये

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ३४ वं महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन डॉ. मेतन फाउंडेशननं, सामाजिक वनीकरण सोलापूर, आणि वन विभाग सोलापूर यांच्या सहकार्यानं येत्या ७, ८, आणि ९ तारखेला सोलापुरात आयोजित केलं आहे. डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी ही माहिती दिली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्हाधिकारी मा. श्री. मिलिंद शंभरकर आहेत. तर संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ, निनाद शहा यांची  निवड झाली आहे. या संमेलनाच्या कार्यशाळेचं उदघाटन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचं बोधचिन्ह म्हणून सापमार गरुड निवडला आहे. सोलापूर जिल्हा माळरान आणि गवताळ प्रदेश तसंच त्यावरच्या जैविक विविधतेसाठी समृद्ध आहे. या माळरानावर अनेक शिकारी पक्षी आढळतात. त्यातला सापमार गरुड पक्षी या माळरानावरचं वैभव म्हणून ओळखला जातो. या संमेलनाची संकल्पना "माळरान- शिकार पक्षी - संवर्धन" ही आहे. या संमेलनामध्ये पक्षी निरिक्षण भ्रमंतीसाठी हिप्परगा तलावाची भ्रमंती, सिद्धेश्वर वनविहाराची भ्रमंती आणि माळरानावर भ्रमंती आयोजित केली आहे.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image