राज्यातल्या १४ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १५३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५२ कोटी ८९ लाखाच्या वर गेली होती. आज सकाळपासून सुमारे ४७ लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आज सकाळपासून  ४ लाख ६७ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १४ कोटी ५ लाखापेक्षा जास्त झाली आहे.