राज्यात कोरोनाचे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबईत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ९ हजार १७० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३२ हजार २२५ वर पोचली आहे. यापैकी सर्वाधिक २२ हजार ३३४ रुग्ण मुंबईत आहेत. काल १ हजार ४४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ८७ हजार ९९१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६५ लाख १० हजार ५४१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४१ हजार ५३३ रुग्ण दगावले. राज्यात कोरोनामुक्तीचा दर घसरुन तो आता ९७ पूर्णांक ३५ शतांश टक्के झाला आहे, तर मृत्यूदर २ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्गाचे ६ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ३ पुणे ग्रामीण, २ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तर १ रुग्ण पुणे महानगर पालिका क्षेत्रातला आहे. राज्यात आतापर्यंत ४६० ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १८० रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे, असं आरोग्य विभागानं कळवलं आहे.