महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही - वर्षा गायकवाड

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं. शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या. तांत्रिक कारणामुळे कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये, यादृष्टीनं इयत्ता ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ३ मार्चपर्यंत, तर १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज १४ मार्चपर्यंत भरण्याची मुभा देत असल्याचं गायकवाड यांनी घोषित केलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image