गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज गोव्यात उपस्थिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा मुक्तिसंग्रामात शहीद झालेल्या क्रांतिकारकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अभिवादन केलं आहे. गोव्याला वसाहत वाद्यांकडून मुक्त करण्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना आज देश अभिवादन करत आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. सशस्त्र दलांनी दाखवलेल्या शौर्याला आपण सलाम करतो, असंही कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गोव्यात गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातल्या शहीदांना अभिवादन केलं. यावेळी ते गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि गोवा मुक्ती संग्रामासाठी तत्कालिन ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचा सन्मान करणार आहेत. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत ३८० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयालाही ते भेट देणार आहे.