नागरिकांनी कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आणि लसीकरण वाढवण्याचं राजेश टोपे यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोविड 19 च्या रुग्ण संख्येमध्ये गेल्या 2-3 दिवसात दुपटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधांविषयी निर्णय घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यातल्या 87 टक्के लोकांनी लसीची पहिली मात्रा तर 57 टक्के लोकांनी लसीची दुसरी मात्राही घेतली आहे. पॉझिटीव्हीटी दर कमी झाला असला, तरी नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी माहिती दिली. जेवढं काही आपल्याला त्वरेनी जे काही लोक राहिले त्यांची लाईन लिस्ट काढण्यात आलेली आहे गाववैज आशा वर्कर्स ला आणि सीएचओ म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ला दिलेल्या आणि त्यांच्याकडे घरोघर जाऊन ते आपण लसीकरण  करण्यासाठी त्यांना काऊन्सिलिंग करत आहोत त्यांना समजावून सांगत आहोत आणि लवकर लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच सेकंड डोसचं  सुद्धा आपल्या जवळ लिस्ट आहे आणि त्यां जे लोक डीयू  झाले त्यांना मेसेज पण जातात त्यांना कळवले आणि त्यांना काउन्सिलिंग करून घेण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जरा अधिक गती द्यावी लागेल आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीने अधिक चांगल्या पद्धतीने त्या त्या स्थानिक सर्वपक्षीय मी मुद्दाम सांगू इच्छितो सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.