भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित- भारत बायोटेक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचं उत्पादक कंपनीने म्हटलं आहे. लशीच्या नमुना चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवॅक्सिन देण्याला औषध महानियंत्रकांनी यापूर्वीच परवानगी दिली असून या विषयातल्या तज्ञ समितीने २ वर्षावरच्या मुलांसाठी ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.