मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आता राष्ट्रपतीना 12 कोटी पत्र पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योग आणि भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित मराठी भाषा दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यंदाच्या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ठराव करावा असे आवाहन देसाई यांनी यावेळी केलं.