टाटा रिअँलिटीच्या इंटेलियन आयटी पार्कचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काल करण्यात आलं. नवी मुंबईत घणसोली रेल्वे स्थानकासमोर सुमारे ४७ एकर क्षेत्रावर इंटेलियन पार्क उभारलं जाणार आहे. या ठिकाणी आयटी, व्यापारी केंद्र, डेटा सेंटर विकास केंद्र असेल. या प्रकल्पामुळे राज्यात ५ हजार कोटी रुपयांची थेट गुंतवणूक येणार आहे. यामुळे नवी मुंबई परिसराचा कायापालट होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.