भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसात पावसाचा व्यत्यय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी पावसामुळं व्यत्यय आला. पावसामुळे आजचा खेळ अजून सुरू झालेला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी काल भारताने पहिल्या डावात ३ बाद २७२ धावा केल्या. काल खेळ संपला तेव्हा केएल राहुल १२२ तर अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत होते.