देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १३७ कोटी ५८ लाख मात्रांचा टप्पा केला पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या ३३८व्या दिवशी आज सकाळपासून देशभरात लसींच्या १० लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. याबरोबरच देशात आजवर दिल्या गेलेल्या लस मात्रांची एकूण संख्या १३७ कोटी ५८ लाखाहून जास्त झाली आहे. यापैकी ५४ कोटी ७७ लाखाहून जास्त जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यातही आज सकाळपासून लसीच्या ४८ हजाराहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत राज्यभरात एकूण १२ कोटी ७७ लाखाहून अधिक लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४ कोटी ८९ लाखाहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.