देशात काल १२ हजार रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक शतांश टक्के झाला आहे. शनिवारी १० हजार रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि  ३१३ रुग्ण दगावले. सध्या १ लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. देशानं शनिवारी कोविड प्रतिबंधक लशींच्या ११६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला. काल ६७ लाख २५ हजार लशींच्या मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या.