देशात काल ११ हजार ९६१ रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १०९ कोटी ६३ लाख मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की काल दिवसभरात ५२ लाख एकोणसत्तर हजार मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. कोरोनाची लागण झालेले ११ हजार ४६६ नवे रुग्ण काल आढळले तर ११ हजार ९६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत कोविडवर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ३७ लाख ८७ हजाराच्या वर गेली असून रुग्ण बरे होण्याचा दर सर्वात जास्त म्हणजे ९८ पूर्णांक २५ शतांश टक्के झाला आहे. सध्या बाधासक्रीय रुग्णांची संख्या गेल्या २६४ दिवसातली सर्वात कमी म्हणजे १ लाख ३९ हजार ६८३ इतकी नोंदली गेली. आठवड्याला नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण १ पूर्णांक २ दशांश टक्के झालंय तर दैनंदिन मोजणीत शून्य पूर्णांक ९ दशांश टक्के झालं आहे. देशात आतापर्यंत ६१ कोटी ८५ लाख कोविड चाचण्या करण्यात आल्या त्यातल्या १२ लाख ७८ हजार चाचण्या गेल्या २४ तासात झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.