राज्यात काल ६८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संखा सातत्यानं कमी होत असल्यानं उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १२ हजाराच्या खाली आली आहे. काल ९१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६८६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६६ लाख २४ हजार ९८६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ६८ हजार ७९१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४० हजार ६०२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ११ हजार ९४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्के झाला आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. मुंबईत काल 225 रुग्ण कोरोनामुक्त झाले, 184 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या 7 लाख 97 हजार 77 झाली आहे. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार 10 दिवसांवर आलाय. यापैकी आत्तापर्यंत 7 लाख 38 हजार 155 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 16 हजार 296 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. सध्या मुंबईत  2 हजार 775 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image
टोकियो पॅरालिंपिक्समधील विजयी खेळाडूंचा रोख बक्षिसांद्वारे गौरव
Image