राज्यात काल ९८२ नवीन कोरोनाबाधित तर १२९३ रुग्ण बरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाचे ९८२ नवे रुग्ण आढळले. नवीन बाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतले २७४ आहेत. राज्यात उपचाराधीन रुग्णसंख्या १३ हजार ३११ आहे. काल १ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ६४ लाख ६१ हजार ९५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६२ दशांश टक्के आहे. कोविड-१९ मुळे काल २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात आज ६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर ५ रूग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकंदर कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ९० हजार ४३३ झाली आहे.या आजारातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या ८७ हजार ७४७  आहे. कोविड-१९ मुळे काल एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात या रोगानं २ हजार ६६३ रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या ३३ आहे.