सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा लांबणीवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक पदांसाठी येत्या ३० ऑक्टोबर २०२१ ला होणारी मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलली असल्याचं आयोगानं जाहीर केलं आहे. या पदासाठी  झालेल्या पूर्व परीक्षेच्या निकालांसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं दिलेल्या अंतरीम आदेशानुसार परीक्षा पुढे ढकलली असल्याचं या संदर्भातल्या निवेदनात म्हटलं आहे. मुख्य परीक्षेची सुधारीत तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे.