भारत संयुक्त राष्ट्राच्या एकजुटीसाठी वचनबद्ध - परराष्ट्र व्यवहारमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रसाठीच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. यावेळी पाठवलेल्या संदेशात डॉ जयशंकर यांनी सुधारित बहुपक्षीयतेच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. जो पुनर्संतुलन, निष्पक्षता आणि बहुध्रुवीयता प्रतिबिंबित करतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्य म्हणून भारत समकालीन आव्हानांकडे तत्त्वनिष्ठ दृष्टीकोन बाळगेल, तसंच संयुक्त राष्ट्र संघाची प्रभावीता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी भारत नेहमीच एक विधायक शक्ती म्हणून काम करेल, असं ते म्हणाले.