इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या योजनेला या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या मुंबई महानगर क्षेत्र तसंच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, आणि नागपूर महानगरपालिकेत सध्या ही योजना राबवली जात आहे. कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. या फेरीअंतर्गत २१ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. वितरणा नंतर २१ तारखेलाच संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. वाढीव कालावधीत इयत्ता १० वी उत्तीर्ण असलेले सर्व तसंच एटिकेटी पास विद्यार्थी पात्र असतील. दिलेल्या वाढीव वेळेमध्ये उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत, यानुसार संबंधित विद्यालयांमार्फत आवश्यक सूचना दर्शनी भागात लावण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image