जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आजवर शिक्षण आरोग्याकडे खूप दुर्लक्ष झालं. कोरोनाची साथ आल्यानन्तर सर्वांची दाणादाण उडाली. पण मी ठामपणे सांगू शकतो की जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. आज विधान भवनात आमदारां साठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्रातले मतदार विधानसभेच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात, मी ज्या आमदाराला मतदान केलं तो माझा लोकप्रतिनिधी माझे किती प्रश्न, माझ्या किती अडचणी विधान सभेत किती मांडतो याकडे त्यांचं लक्ष असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या आयुष्यात कोणते बदल यातून घडतात, कोणते निर्णय इथं होतात हे ही मतदार पाहत असतो, असंही आपल्या भाषणाच्या समारोपात ते म्हणाले.