अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून १० हजार कोटी जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली. ही मदत खालील प्रमाणे राहील.

•जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर

•बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रति हेक्टर

•बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर

 ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.