मुंबईतल्या गेट वे आँफ इंडिया इथं स्वच्छता मोहिम

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रिडा मंत्रालय देशभरात 'क्लीन इंडिया' मोहिम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत आज मुंबईतल्या गेट वे आँफ इंडिया इथं स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. कोविड निर्बंधांच पालन करत विविध स्वयंसेवी संस्थांच्या ५० स्वयंसेवकांनी गेट वे आँफ इंडिया परिसराची स्वच्छता केली. त्यांनी परिसरातला कचरा जमा करून त्याचं ओला आणि सुका असं वर्गीकरण केलं. तसंच प्लास्टिक कचरा वेगळा केला. या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा आणि पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला. या स्वच्छता मोहिमेला युवा व्यवहार विभागाच्या सचिव उषा शर्मा, नेहरु युवा केंद्राचे महासंचालक विजय कुमार, नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाशकुमार मानुरे उपस्थित होते. स्वच्छतेच्या माध्यमातूनच स्वस्थ आणि निरोगी भारताच उद्दिष्ट गाठता येईल, असं उषा शर्मा यांनी यावेळी सांगितलं.  या स्वच्छता मोहिमेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून विविध सामाजिक संघटनांचे, एनसीसीचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, जिल्हा प्रशासनासह मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी या मोहिमेत सहभागी होत आहेत. परिसराची स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश या माध्यमातून पोहचविण्यात येत असल्याचही शर्मा यांनी यावेळी सांगितलं.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image
टोकियो पॅरालिंपिक्समधील विजयी खेळाडूंचा रोख बक्षिसांद्वारे गौरव
Image