भूमी अभिलेख विभागाच्या गट ‘क’ संवर्गातली प्रादेशिक स्तरावरची पदं भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भूमी अभिलेख विभागाच्या गट ‘क’ संवर्गातली प्रादेशिक स्तरावरची पदं भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात ही भरती होणार आहे. यासाठी स्थापन समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील. समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याचा अधिकार जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक यांना असेल, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.