आज विदर्भ आणि मराठवाड्यात तर उद्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आज विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उद्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे ३ दिवस मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केले आहे.