वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

  वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आज वांद्रे, विलेपार्ले आणि सांताक्रुझ येथे आयोजित मोफत लसीकरण  शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली.

सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी श्री. ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एच एन रिलासन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर, विलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉल आणि सांताक्रुझ येथील साने गुरूजी शाळेत आज प्रत्येकी तीन हजार लसींचे डोस देण्यात येत आहेत.

लसीकरण शिबिरांचे आयोजन करताना कोविड विषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुभाष सावंत, माजी महापौर प्रि.विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक सदा परब, शेखर वायंगणकर, श्रीमती रोहिणी कांबळे, संदीप नाईक, युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image