राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होणार : वर्षा गायकवाड

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड निर्बंध शिथील असलेल्या भागात येत्या १७ ऑगस्टपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात यासंदर्भात बैठक होणार असून, त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. निर्बंध शिथील असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग जून महिन्यापासून सुरू आहेत.