देशात गेल्या चोवीस तासात ४२ हजार ६२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 42 हजार 625 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 36 हजार 668 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळे देशात 562 मृत्युंची नोंद झाली. उपचाराखालील कोरोना रुग्णांमध्ये 5 हजार 395 नं वाढ झाल्यामुळं सध्या देशातील उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 10 हजार 353 वर गेली आहे. यांचं प्रमाण 1 पूर्णांक 28 शतांश टक्के आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 38 शतांश टक्के आहे. देशात कोविड-19 मुळं आजवर दगावलेल्यांची संख्या 4 लाख 25 हजार 727 झाली आहे.