पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोविड 19 बाबतच्या प्रोटोकॉल्सचं कठोर पालन करण्याचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 बाबतच्या प्रोटोकॉल्सचं कठोर पालन करावं असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते कोविड आढावा बैठकीत बोलत होते. मुंबई महानगरात पुन्हा एकदा वाढू लागलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, पाच पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेल्या इमारती सील कराव्यात असही त्यांनी म्हटलं आहे. सील केलेल्या इमारतींच्या बाहेर पोलिस कर्मचारी तैनात करावेत, अशा इमारतीं मधल्या कोरोना रुग्णांना घराबाहेर पडून देऊ नये, तसच इमारतीबाहेरील आणि इमारतीतील इतर लोकांना त्यांच्या संपर्कात येऊ देऊ नये, मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात सुरू असलेली कारवाई कायम ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, हे खबरदारीचे उपाय असल्याचं चहल यांनी स्पष्ट केलं आहे.