ऑलंपिक स्पर्धेत तिरंदाजी मुष्टीयुद्ध आणि हॉकीत भारताची घोडदौड सुरुच  

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या मनू भाकर हीने २५ मीटर पिस्तुल शूटिंग प्रकारात २९२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त केले आहे तर राही सरनोबत हिनं २८७ गुणांसह १८वे स्थान प्राप्त केले आहे. या स्पर्धेची पुढची फेरी उद्या होणार असून त्यामधून पहिले ८  स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारताचा मुष्टियोद्धा सतीश कुमार यानं आपल्या जमैकन प्रतिस्पर्ध्याला नमवत पुरुषांच्या मोठ्या वजनी  गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे.

भारतीय तिरंदाज अतनु दास यानं दक्षिण कोरियाच्या खेळाडूला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हॉकीत भारताच्या पुरुष संघाने अर्जेंटिनाला ३ -१ असं नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या वरूण कुमार, विवेक सागर प्रसाद आणि हरमनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयामुळे भारत पूल ए मध्ये  दुसऱ्या स्थानावर पोचला आहे. भारताचा यानंतरचा सामना यजमान जपान संघाबरोबर उद्या होणार आहे. भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने अवघ्या ४१ मिनिटात डेन्मार्कच्या खेळाडूला २१-१५,२१-१३ असं नमवत महिलांच्या एकेरी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.