हिंसाचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी केंद्र सरकारकडून महिलांसाठी मदत क्रमांकाची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसेविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांकरता विशेष दूरध्वनी मदत क्रमांकाचं उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज केलं. ७८२ ७१७ ०१ ७० हा विशेष मदत क्रमांक उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाचं अभिनंदन केलं. तातडीच्या आणि बिनतातडीच्या प्रकरणातही २४ तास या क्रमांकाची सेवा उपलब्ध राहील. संकटकाळी आयोग आणि सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असं इराणी म्हणाल्या. देशभरातल्या महिलांना पोलीस, रुग्णालय, कायदाविषयक मार्गदर्शन तसंच मानसशास्त्रीय समुपदेशन अहोरात्र उपलब्ध रहावं याकरता या क्रमांकाची सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवा जोडून देण्याचं काम तसंच याविषयीची माहिती या मदत क्रमांकावर मिळणार आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image