जिल्हानिहाय कोरोना अहवाल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात काल १०७२ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली.सध्या १० हजार ३७८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल १६ रुग्ण दगावले.नांदेड जिल्ह्यात काल ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात ८ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ५८ रुग्ण उपचार घेत आहेत.परभणी, जिल्ह्यात काल बरे झालेल्या ९ रुग्णांना घरी पाठवलं. काल जिल्ह्यात ७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या जिल्ह्यात ८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.वाशिम जिल्ह्यात काल ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल ४ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या ६८ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६२२ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.जालना जिल्ह्यात काल ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात एकाही नवीन रुग्णांची नोंद नाही. सध्या ५४ रुग्ण उपचाराधीन आहेत.