सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार आहे. सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या खात्याचा उपयोग करता येईल. रिझर्व्ह बँकेने काल आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेची घोषणा केली.

याअंतर्गत सामान्य नागरिकांना हे खाते उघडता येणार आहे. यासाठी एक विशेष वेबसाइट सुरू केली जाणार आहे. यासाठी देशातल्या बँकेत बचत खाते, पॅन कार्ड, केवायसीसाठी आवश्यक कागदपत्र, इमेल आयडी आणि मोबाईल असणे आवश्यक आहे.

हे खाते व्यक्तिगत किंवा संयुक्तही उघडता येईल. अनिवासी गुंतवणूकदार फेमा कायद्याच्या तरतुदींनुसार हे खाते उघडू शकतील. ही सुविधा सुरू करण्यासाठी तारीख रिझर्व्ह बँक लवकरच जाहीर करणार आहे.