गुजरातमध्ये आजपासून ९ वी ते ११ वीचे वर्ग सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये आजपासून पुन्हा एकदा ५० टक्के क्षमतेनं ९ वी ते ११ वी चे वर्ग सुरु होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी मागील आठवड्यात हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नसेल तसच ऑनलाईन शिक्षणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे. जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार असतील त्यांच्या पालकांच्या सहीच संमती पत्र शाळेला देणं आवश्यक असणार आहे. तसच विद्यार्थी तसच शाळेचे शिक्षक आणि कर्मचार्याना मास्क, सुरक्षित अंतराचे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे.