औषध उद्योगासाठी २ डीजी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा डीआरडीओचा प्रस्ताव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना तथा डीआरडीओनं भारतीय औषध उद्योगासाठी २ डीजी तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या महिन्याच्या १७ तारखेपर्यंत औषध उद्योग स्वारस्य अभिव्यक्ति अर्ज दाखल करू शकतात.

कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी डीआरडीओनं २ डिऑक्सी डी ग्लुकोज हे औषध शोधून काढलं असून तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी स्वारस्य अभिव्यक्ति अर्ज पाठवण्याचं आवाहन केलं आहे.

डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्यानं डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेसनं हे औषध विकसित केलं आहे.