सोलापूरच्या डिसले गुरुजींची जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्यातल्या बार्शी इथले ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. ते आता जागतिक बँकेला शिक्षण विषयक गोष्टीचा सल्ला देणार आहेत. डिसले गुरूजी यांची जून २०२१ ते २०२४ या तीन वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

जगभरातल्या  मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा उपक्रम जागतिक बॅकेंनं हाती घेतला आहे. त्यासाठी जगभरातून जवळपास १२ सल्लागारांची निवड करण्यात आली आहे.