आकाशवाणीच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांचा उद्या जनतेशी संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून, तसंच ww.newsonair.com हे संकेतस्थळ आणि newsonair या मोबाईल अॅपवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.

आकाशवाणी, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल. या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल.