मुंबईत लसीकरणासाठी ३३५ केंद्र उपलब्ध

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत लसीकरणासाठी ३३५ केंद्र उपलब्ध असून दिवसाला ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. एक कोटी लसींच्या मात्रा मिळाल्यानंतर प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे ४५४ लसीकरण केंद्र सुरू केले जातील. अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. यामुळे दिवसाला एक लाख डोस देणे शक्य होईल, असंही ते म्हणाले.  मुंबईत १८ वर्षांवरील साधारणत: ९० लाख नागरिक लसीकरणास पात्र असून त्यापैकी सध्या सुमारे ३१ लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर साडे सात लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, असं ते म्हणाले.