राज्यात आतापर्यंत ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण कोरोनामुक्त
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ११ हजार ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ४ कोटी१ लाख २८ हजार ३५५ प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी झाली. त्यात १४ पूर्णांक ९५ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. म्हणजेच ५९ लाख ९७ हजार ५८७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण बरे झाले. तर, १ लाख १९ हजार ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या राज्यात १ लाख २१ हजार ८५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ९३ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर १ पूर्णांक ९९ शतांश टक्के आहे. सांगली जिल्ह्यात काल १ हजार १ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल ९४७ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या ८ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल या आजाराने १७ रुग्णांचा बळी घेतला.
मुंबईत काल ७११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ९१ हजार १२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ८६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख २३ हजार ३२४ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ७२८ दिवसांवर आलाय. सध्या १४ हजार ५७७ रुग्ण उपचार घेतायत. काल २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा १५ हजार ३३८ वर पोहचलाय.
परभणी जिल्ह्यात काल २१ रुग्ण बरे होऊन घरी गेले काल जिल्ह्यात २३ नवीन रुग्ण आढळले सध्या २५२ रुग्ण उपचार घेत आहेत काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात काल झालेल्या ४२ घरी पाठवलं काल जिल्ह्यात २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला सध्या जिल्ह्यात २०१ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
हिंगोली जिल्ह्यात काल चार रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली जिल्ह्यात काल चार रुग्णांना कोरोनाची लागण झाली सध्या ३६ रुग्ण उपचाराधीन आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात काल २८ रुग्णांनी या आजारावर मात केली काल १८ नवीन रुग्णांची भर पडली सध्या जिल्ह्यात ५९६ रुग्ण उपचार घेत आहेत जिल्ह्यात काल ३ रुग्णांनी आपला प्राण गमावला.
वाशिम जिल्ह्यात काल ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले काल १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले सध्या जिल्ह्यात ३०१ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारामुळे ६१५ रुग्ण दगावले आहेत.
जालना जिल्ह्यात काल ४२ रुग्णांना रूग्णालयातून सुटी दिली. काल १४ नवीन रुग्ण आढळले. सध्या २४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल या आजारामुळे २ रूग्ण दगावले.
धुळे जिल्ह्यात काल ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल ८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ८४ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.