संपूर्ण महाराष्ट्रात बार्टीच्या वतीने वृक्षारोपण पंधरवाड्याचे आयोजन

 

पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने समतादूत प्रकल्पांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात लोकसहभागातून 5 जून ते 20 जून 2021 या कालावधीत वृक्षारोपण पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्याचे राज्यस्तरीय उदघाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी येथे वृक्षारोपण करून करण्यात आले . महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनीही येरवडा संकुल येथे वृक्षारोपण केले. महासंचालक गजभिये यांनी ऑनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व समतादूत , प्रकल्प आधिकारी, संस्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

कोरोना महामारीमुळे प्राणवायूला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून वसुंधरेचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे. जन्मापासून आपण प्राणवायूचा वापर करत असतो. त्याची परतफेड आपण करूया आपण प्रत्येकाने एक वृक्ष लावावे व त्याचे संवर्धन करावे .लावलेले प्रत्येक रोपटे आयुष्यभर जगले पाहिजे .भविष्यात त्या वृक्षाला फुले ,फळे आले पाहिजे. ते सावलीसह प्राणवायू देईल. वृक्षांचे संगोपन करणे हे आपले कर्तव्य असून संपूर्ण राज्यात समतादूत प्रकल्पअंतर्गत लोकसहभागातून 50 हजार वृक्षारोपणाचा संकल्प करत आहोत. लोकसहभागातून त्या वृक्षांचे संगोपन करण्यात येईल. महाराष्ट्रात हरित क्रांतीचे तसेच लोकचळवळीचे समतेचे रोपटे वंचित घटकांपर्यंत सर्वांगीण विकास होण्यासाठी काम करेल .असे प्रतिपादन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले केले. ते पुढे म्हणाले की समता दूत प्रकल्पांतर्गत गेल्या अनेक वर्षापासून राज्यात अनेक समाज उपयोगी कामे झाले आहेत. आपण जनजागृतीचे रोपटे लावत आहोत.

भविष्यात याचा वटवृक्ष होईल. हे सर्व रोपटे जगावे यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यावी. लोकसहभागातून हा प्रकल्प उभा करत आहोत. गावागावात सर्वांगीण विकास होईल . हे वृक्ष वटवृक्षात रुपांतर होईल. बार्टीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वृक्षरोपण अभियानाचे राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत . जून महिन्यामध्ये संपूर्ण राज्यात बार्टीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार असून या अभियानात जनतेने लोकसहभागातून सहभागी व्हावे असे आवाहन श्री धम्मज्योती गजभिये यांनी यावेळी केले. यावेळी श्री. मदन कुमार शेळके, प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे, श्री मेघराज भाते, विभाग प्रमुख योजना बार्टी, डॉ. मुकेश दुपारे, प्रकल्प व्यवस्थापक, नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, श्री सचिन नांदेडकर, समता दूत प्रकल्प अधिकारी, श्रीमती जागृती गायकवाड, आदी बार्टीतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रांमध्ये इंजीनियरिंग क्लस्टर, पिंपरी चिंचवड येथे मा. श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी, पुणे यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी श्री लोंढे , संचालक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,श्री सागर शिंदे, इंजिनियरिंग क्लस्टर हेड ,व ईतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत प्रकल्पाअंतर्गत लोकसहभागातून वृक्षाचे रोपण करण्यात आले. या वृक्षारोपण अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी ,ग्रामसेवक ,अंगणवाडी व आशा सेविका, वनरक्षक अधिकारी, तहसीलदार ,गट विकास अधिकारी, शिक्षक , मुख्याध्यापक, नागरिक आदी सहभागी झाले होते. प्रस्ताविक श्री सचिन नांदेडकर यांनी केले.आभार श्री मेघराज भाते ,योजना प्रमुख बार्टी यांनी मानले.